शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 8 जुलै 2019 (09:34 IST)

काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरू

काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी सरचिणीस पदाचा राजीनामा दिला आहे. ट्विवटरवरून त्यांनी राजीनाम्याची माहिती दिली आहे. ट्विटमध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांनी म्हटले आहे की, “लोकांचा निर्णय स्वीकारत आणि त्याची जबाबदारी घेत, मी राहुल गांधी यांना माझा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा सादर केला आहे. मला ही जबाबदारी आणि आमच्या पक्षाची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.  
 
त्याआधी मिलिंद देवरा यांनी मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. आपल्या पदाचा राजीनामा सोपवतांना त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकांसाठी मुंबई कॉंग्रेसचे नेतृत्व करण्यासाठी तीन सदस्यीय पॅनेलचा प्रस्तावही त्यांनी मांडला आहे. महाराष्ट्रात भाजप-शिवसेना आणि वंचित आघाडीचा सामना करणे हे काँग्रेससाठी मोठे आव्हान असल्याचे देवरा यांनी राजीनामा देताना स्पष्ट केले आहे.