1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 4 जुलै 2019 (09:49 IST)

सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आता मराठीत

top court verdic
सर्वोच्च न्यायालयाचे निकाल लवकरच मराठीसह सहा प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध करून दिले जाणार आहेत. इंग्रजीनंतर आता मराठी, हिंदी, तेलगू, आसामी, कन्नड आणि ओरिया या सहा भाषांमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर महिनाअखेरपासून निकाल उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
 
सर्वोच्च न्यायालयाचे निकाल सहा प्रादेशिक भाषांमध्ये अनुवादित करण्यासाठीचे सॉफ्टवेअर सर्वोच्च न्यायालयाच्या ‘इलेक्ट्रॉनिक सॉफ्टवेअर विंग’ने विकसित केले असून, सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी त्याला औपचारिकरीत्या मंजुरी दिली आहे. प्रत्येकालाच इंग्रजी भाषेतील निकाल समजणे शक्य नसते. त्यामुळे वादी आणि प्रतिवादी यांना न्यायालयाने दिलेला निकाल सहजरीत्या समजावा, यासाठी प्रादेशिक भाषांमध्ये निकाल उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली 2017 साली पार पडलेल्या एका कॉन्फरन्समध्ये हा विषय ऐरणीवर आला होता.