1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. Three friends were arrested for hunting and eating a python in Kerala

धक्कादायक! अजगराला पकडून तीन तुकडे केले; नंतर त्याला शिजवून खाल्ले, तीन जणांना अटक

केरळ पोलिसांनी अजगराची शिकार करून खाल्ल्याप्रकरणी तीन मित्रांना अटक केली आहे. या तिन्ही आरोपींनी अजगराची शिकार करून, त्याचे तुकडे करून, शिजवून नंतर त्याला खाल्ले होते.
मिळालेल्या माहितीनुसार केरळमधील त्रिशूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी अजगराची शिकार केल्याप्रकरणी तीन जणांना अटक केली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी आधी अजगराला पकडले, नंतर त्याला मारले, त्याचे तुकडे केले, ते शिजवले आणि नंतर खाल्ले. पोलीस पथकाने आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. वन अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले की, मन्नमंगलम येथे अजगराची शिकार करून खाल्ल्याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे.  ते सर्व मन्नमंगलमजवळील चेरुकुन्नूचे रहिवासी आहे. 
Edited By- Dhanashri Naik
पुढील लेख
उत्तराखंडमध्ये पुढील दोन दिवसांसाठी चार धाम यात्रा स्थगित, अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा रेड अलर्ट