गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 1 जुलै 2024 (11:00 IST)

वीज कोसळल्यामुळे पुजारीसोबत तीन जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

lighting strike
उत्तर प्रदेश मधील देवरिया जिल्ह्यामध्ये रविवारी पाऊसामुळे एका मंदिरावर वीज पडली, ज्यामध्ये पुजारी सोबत तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर सात जण जखमी झाले आहे. 
 
उत्तर प्रदेशच्या देवरिया जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरु होता याच दरम्यान एका मंदिरात लोकांनी आसरा घेतला होता पण मंदिरावर वीज कोसळल्याने यामध्ये पुजारी आणि तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर सात जण गंभीर जखमी झाले आहे. तसेच संत कबीर नगर जिल्ह्यामध्ये वीज कोसळल्याने एका मुलाचा मृत्यू झाला आहे. तर चार जण जखमी झाले आहे. देवरिया पोलीस स्टेशनच्या अधिकारींकडून ही माहिती मिळाली आहे. 
 
नगर कोतवाली क्षेत्रच्या गोपालपुर गावात असलेल्या एका मंदिरात पावसापासून वाचण्यासाठी मंदिरात उभे होते, या दरम्यान वीज थेट मंदिरावर कोसळली. ज्यामुळे चार जणांचा मृत्यू झाला आहे तर इतर जखमींना उपचारांसाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आला आहे. तसेच जिल्हाधिकारींनी माहिती दिली की, मृतांच्या कुटणंबियननं आर्थिक मदत करण्यात येईल. 

Edited By- Dhanashri Naik