मंगळवार, 26 सप्टेंबर 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : बुधवार, 8 डिसेंबर 2021 (18:19 IST)

CDS जनरल बिपीन रावत यांचे अपघातात दुःखद निधन

तामिळनाडूतील कुन्नूरच्या जंगलात बुधवारी लष्कराचे एमआय-17हेलिकॉप्टर कोसळले. घनदाट जंगलात झालेल्या या अपघातानंतर हेलिकॉप्टरने पेट घेतला. यामध्ये चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी मधुलिका यांच्यासह लष्कराचे 14 अधिकारी होते.त्यांचे अपघातात दुःखद निधन झाले आहे. भारतीय हवाई दलाने त्यांच्या मृत्यूची पुष्टी केली. 
देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत यांचे निधन झाले. तामिळनाडूतील कुन्नूर येथे आज झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात ते त्यांच्या पत्नीसह अन्य 11 अधिकारी ठार झाले. भारतीय हवाई दलाने हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी आणि इतर 11 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे.