गुरूवार, 7 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 1 फेब्रुवारी 2018 (15:35 IST)

बजेटचे केले विटंबन, ट्विटरवर झाले ट्विपल्स ‘हास्यसंकल्प’ सादर

twitter
अर्थसंकल्पाकडून मध्यमवर्गीय नोकरदार वर्गांच्या जास्त अपेक्षा होत्या. पण, अपेक्षांवर पाणी पडल्याच्या भावना बजेट सादर झाल्यानंतर मध्यम वर्गाकडून सोशल मीडियावर व्यक्त होताना आता दिसत आहे. जेटलींचा अर्थसंकल्प संसदेत सादर होताना ट्विटरवर मात्र ट्विपल्स ‘हास्यसंकल्प’ सादर करत होते. त्यामुळे ट्विटरवर विनोदांचा हा हास्यसंकल्प ट्रेंडमध्ये आलेला दिसला. समजायला थोडासा अवघड असलेला हा अर्थसंकल्प सामान्य लोकांनी आपली डोकॅलिटी वापरून वेगवेगळ्या चित्रपटामधल्या संवादातून, चित्रातून, समजला असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला.