शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , गुरूवार, 3 सप्टेंबर 2020 (09:13 IST)

PM Twitter: पंतप्रधान मोदींचे ट्विटर अकाउंट हॅक झाले, लवकर झाले रिकवर

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi)  यांची इलेक्ट्रॉनिक सुरक्षा यंत्रणा हॅकर्स तोडली. तथापि हे हॅ़किंग फार काळ टिकले नाही. ते लवकरच रिकवर करण्यात आले. परंतु या घटनेमुळे चिंता नक्कीच वाढली आहे.
 
खाते हॅक करून मागितले बिटकॉइन
 
गुरुवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास पंतप्रधानांच्या वैयक्तिक वेबसाइटवर नरेंद्र मोदी यांचे ट्विटर अकाउंट हॅक करण्यात आले. हॅकरने COVID-19 रिलीफ फंडासाठी देणगीमध्ये बिटकॉईनची मागणी केली. या खात्यावर पंतप्रधानांचे 25 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. हॅकर्सनी ट्विट करून क्रिप्टो चलनातून पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमध्ये देण्याची मागणी केली. तथापि, नंतर खाते रिकवर केले गेले.
पंतप्रधान मोदींच्या वैयक्तिक ट्विटर अकाउंटवर दिलेल्या संदेशामध्ये, " COVID-19 साठी तयार करण्यात आलेल्या पीएम मोदी रिलीफ फंडामध्ये आपण लोकांना देणगी द्यावी असे मी आवाहन करतो".