शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शनिवार, 29 ऑगस्ट 2020 (16:02 IST)

आता ट्विटरवर नो कॉपी पेस्ट

ट्विटरने कॉपी पेस्ट होणारे ट्विट हाइड करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे, जर कोणाचे ट्विट कॉपी करून ते पेस्ट करत असाल किंवा एकच ट्विट अनेकजण करत असतील, तर ते ट्विट लोकांच्या टाइमलाइनवरून हाइड केले जाणार आहेत.
 
ट्विटरकडून या संदर्भात ट्विट करून सविस्तर माहितीही देण्यात आली आहे. ट्विटरकडून सांगण्यात आले आहे की, मागील काही वर्षांमध्ये त्यांच्या प्लॅटफॉर्मवर कॉपी-पेस्ट ‘copypasta’ वाल्या ट्वटिच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. एकाच ट्विटला अनेकजण कॉपी करून ट्विट करत आहेत. अशावेळी आम्ही अशा ट्विटची व्हिजिबिलीटी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.