हॉटेलमध्ये मोठा अपघात; स्विमिंग पूलमध्ये विजेचा धक्का लागून दोन परदेशी नागरिकांचा मृत्यू
बंगळूरमधील एका हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये विजेचा धक्का लागून जर्मन एअरलाइनच्या एका क्रू सदस्यासह दोन परदेशी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करताना इतर दोघे जखमी झाले.
शुक्रवारी संध्याकाळी बंगळूरमधील एका हॉटेलमध्ये मोठा अपघात झाला. हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये पोहताना विजेचा धक्का लागून दोन परदेशी नागरिकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये जर्मन एअरलाइन लुफ्थान्साच्या एका क्रू सदस्याचा समावेश आहे. या अपघातात इतर दोघे जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ही घटना बंगळूरुच्या हलासुरू भागातील एका हॉटेलमध्ये घडली. शुक्रवारी संध्याकाळी, दोन परदेशी नागरिक हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरील स्विमिंग पूलमध्ये पोहत असताना त्यांना विजेचा धक्का लागल्याचे वृत्त आहे. अपघाताच्या कारणाचा सध्या तपास सुरू आहे.
