गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 17 ऑक्टोबर 2023 (17:22 IST)

Bihar News : आपापसात भिडले दोन पोलीस

birar police
Bihar Viral Videoबिहारच्या जीरोमाईल औद्योगिक पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन पोलीस कर्मचारी आपापसात भांडताना दिसत आहेत.  आपापसात भांडणाऱ्यांपैकी एक ट्रॅफिक पोलीस आहे आणि दुसरा डायल 112 कॉन्स्टेबल आहे. वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या ट्रॅक्टरला वाहतूक पोलिसांनी पकडलं. त्यानंतर 7000 रुपयांचं चलन देण्याबाबत बोलू लागला. पण हा ट्रॅक्टर डायल 112 मध्ये उपस्थित असलेल्या होमगार्डचा आहे हे त्याला माहीत नव्हतं.
 
डायल 112 हा सिव्हिल ड्रेसमधील कॉन्स्टेबल हेल्मेट न घालता मोटारसायकलवरून वाहतूक पोलिसाकडे आला. त्यानंतर ट्रॅफिक पोलिसांचे एसआय आणि दोन कॉन्स्टेबल यांनी त्या डायल 112 वाहनाच्या होमगार्ड जवानाशी जोरदार हाणामारी सुरू केली. डायल 112 कॉन्स्टेबलचा ट्रॅक्टर जप्त करून त्याला 2000 रुपयांचे चलन बजावण्यात आलं.
 
डायल 112 च्या कॉन्स्टेबलने ट्रॅफिक पोलिसाला तुला बघून घेईन असं म्हटलं. त्यानंतर रस्त्याच्या मधोमध दोघांची हाणामारी झाली. यावेळी तिथे उभी असलेली लोकं ही संपूर्ण घटना पाहत होते. गर्दीतील कोणीतरी त्यांचा हा व्हिडीओ बनवला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला.