UP: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी, 112 वर मेसेज आला
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर लखनौमध्ये अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लखनौ पोलिसांनी मंगळवारी ही माहिती दिली. 'डायल 112' (उत्तर प्रदेश सरकारने आपत्कालीन सेवांसाठी सुरू केलेला नंबर) वर संदेशाद्वारे ही धमकी देण्यात आली.
धमकी देणार्या व्यक्तीने सांगितले की "मी सीएम योगी यांना लवकरच मारून टाकीन." धमकी मिळाल्यानंतर '112' च्या ऑपरेशन कमांडरने सुशांत गोल्फ सिटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. आयपीसी कलम 506, 507 आणि आयटी ऍक्ट 66 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री योगी यांना 23 एप्रिल रोजी रात्री 8:22 वाजता यूपी-112 मुख्यालयातील सोशल मीडियाच्या व्हॉट्सअॅप डेस्कवर धमकीचा संदेश आला.
या मेसेजमध्ये योगी सेंमी को मार दुगा जल्दी ही असे लिहिले होते. सीएम योगी यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
15 एप्रिलच्या रात्री प्रयागराजमध्ये अतिक आणि अशरफ यांच्या हत्येनंतर मुख्यमंत्री योगी यांची सुरक्षा वाढवण्यात आली होती. यासोबतच मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी कोणाच्याही हालचालींवर बंदी घालण्यात आली आहे. यूपीबाहेरही सीएम योगींची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
Edited by - Priya Dixit