बुधवार, 21 फेब्रुवारी 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2022 (07:50 IST)

भीती आणि द्वेषाच्याविरोधात आम्ही भारतजोडो यात्रा सुरू केली : राहुल गांधी

नांदेडमधील नवा मोंढा येथे राहुल गांधी यांची सभा झाली. यावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर निशाणा साधला. याशिवाय, मागील काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातून मोठे प्रकल्प बाहेर राज्यात जात असल्यावरूनही राहुल गांधी यांनी “जसे महाराष्ट्रातू मोठे प्रकल्प गायब होताय, फॉक्सकॉनचा प्रक्लप गेला. एअरबसचा प्रकल्प गेला, तसेच १५ लाखही गायब झाले.” असं म्हणत राहुल गांधी यांनी टीका केली.
राहुल गांधी भाषणात म्हणाले, “जसे महाराष्ट्रातू मोठे प्रकल्प गायब होताय, फॉक्सकॉनचा प्रक्लप गेला. एअरबसचा प्रकल्प गेला, तसेच १५ लाखही गायब झाले.” त्यांच्या धोरणांमुळे भीती पसरत आहे. तुम्ही शेतकऱ्यांना एमएसपी देऊ नका, त्याचे कर्जही माफ करू नका, त्याला योग्य भाव देऊ नका त्याच्या मनात भीती निर्माण होते. तुम्ही तरुणांना सांगा की तुम्हाला रोजगार देणार नाही. तुमच्या आई-वडिलांनी तुमच्या शिक्षणासाठी लाखो रुपये खर्च केले, परंतु तुम्हाला रोजगार मिळणार नाही. त्याच्या मनात भीती निर्माण होते. कामगारांना सांगा मनरेगा बंद करू तर त्याच्या मनात भीती निर्माण होते. या भीतीला नरेंद्र मोदी आणि भाजपा द्वेषात बदलतात, हे काम करतात. भीती आणि द्वेषाच्याविरोधात ही आम्ही भारतजोडो यात्रा सुरू केली आहे.”
Edited by : Ratnadeep Ranshoor