मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 27 जून 2020 (11:41 IST)

मुलाला बेदखल करून हत्तींच्या नावे केली संपत्ती

काही श्रीमंत व्यक्‍तींनी आपली संपत्ती पाळीव कुत्र्याच्या किंवा मांजराच्या नावे केल्याच्या घटना पाश्‍चात्त्य देशांमध्ये घडलेल्या आहेत. मात्र, आपल्या देशातही असाच एक प्रकार घडला आहे. बिहारमधील एका व्यक्‍तीने आपले न ऐकणार्‍या मुलाला संपत्तीमधून बेदखल करून कोट्यवधींची संपत्ती हत्तींच्या नावे केली आहे!
 
अख्तर इमाम असे या व्यक्‍तीचे नाव. आपला मुलगा बिघडला आहे आणि आपला सदुपदेश ऐकत नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी हे पाऊल उचलले. पाटण्याच्या दानापूर येथे ते राहतात. त्यांनी आपली पाच कोटी रुपयांची संपत्ती दोन हत्तींच्या नावे केली आहे. अख्तर यांनी म्हटले आहे की आपला मुलगा चुकीच्या मार्गाने जात असल्याने त्याला संपत्तीमधून बेदखल करण्यात आले. अर्धी संपत्ती आपल्या पत्नीच्या नावे तर अर्धी संपत्ती दोन हत्तींच्या नावे करण्यात आली. इमाम यांनी रजिस्ट्री ऑफिसमध्ये जाऊन दोन्ही हत्तींच्या नावाचे दस्तावेजही बनवले आहेत.