1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: दाहोद , बुधवार, 15 सप्टेंबर 2021 (20:33 IST)

हेल्मेट घातलं असल्यानं दुचाकीस्वाराचे प्राण थोडक्यात वाचले

Wearing
आपल्या देशात बरेच जण हेल्मेटचा उपयोग दंड चुकवण्यासाठी करतात. हेल्मेट आपल्याच सुरक्षेसाठी परिधान करायचं असतं ही बाब अनेकांच्या अद्याप लक्षात आलेली नाही. समोर वाहतूक पोलीस दिसला की त्याला पाहून हेल्मेट डोक्यावर चढवणाऱ्यांची संख्या कमी नाही.   
 
गुजरातच्या दाहोदमध्ये एक घटना घडली आहे. येथे झालेल्या एका अपघातात दुचाकीवरून खाली कोसळलेल्या एका व्यक्तीच्या डोक्यावरून ट्रॅक्टरच्या ट्रॉलीच चाक गेलं. मात्र त्याला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. हेल्मेट घातलं असल्यानं दुचाकीस्वाराचे प्राण थोडक्यात वाचले.