सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मुंबई , गुरूवार, 4 नोव्हेंबर 2021 (19:44 IST)

समीर वानखेडेंविरोधात जात पडताळणी समितीकडे तक्रार ..

अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाचे (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) हे मुस्लिम असल्याचा दावा केला जात आहे. खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे त्यांनी नोकरी मिळवल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणात समीर वानखेडे यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे धाव घेतली होती. आता त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.
 
वानखेडेंचा जात प्रमाणपत्र खोटे आहे, असा दावा करीत दोन दलित संघटनांनी मुंबई शहर जिल्हा जातपडताळणी समितीकडे तक्रार दाखल केली आहे. स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी आणि भीम आर्मी अशी या संघटनांची नावे आहेत. वानखेडे यांनी सरकारी नोकरी मिळवण्यासाठी ते अनुसूचित जातीतील असल्याचे खोटे प्रमाणपत्र सादर केले, असा दावा या संघटनांनी केला आहे. वानखेडे यांच्या विरोधात अधिकृत तक्रार जात पडताळणी समितीकडे दाखल झाल्याने ते अडचणीत आल्याची चर्चा आहे.