रविवार, 15 सप्टेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 10 ऑगस्ट 2024 (14:30 IST)

कोलकाता येथे महिला डॉक्टरवर बलात्कार करून निर्घृण हत्या, एकाला अटक

कोलकाताच्या मेडिकल कॉलेजच्या सेमिनार हॉल मध्ये एका ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित तरुणी बेशुद्ध अवस्थेत आढळली. नंतर तिचा दुर्देवी मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तरुणीच्या शरीरावर आणि गुप्तांगावर अनेक जखमांच्या खुणा आढळल्या आहे. 

पीडित आणि मयत तरुणी आपत्कालीन इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील सेमिनार हॉल मध्ये अर्धनग्न अवस्थेत आढळली. तिचा चष्मा जवळच पडला होता. तिच्या शरीरावर जखमांच्या खुणा होत्या. शवविच्छेदनाच्या अहवालात तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे.

तिचा गळा आवळून हत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुरुवारी रात्री रुग्णालयात कर्तव्य बजावणाऱ्या डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांचे ड्युटी रोस्टर ताब्यात घेतले असून एकाला अटक केली आहे. 
या घटनेनंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बेनर्जीने पीडितेच्या पालकांना भेटून निष्पक्ष तपास करण्याचे आश्वासन दिले. 
 
Edited by - Priya Dixit