यंदा 2023 साली चैत्र नवरात्रीमध्ये नवरात्र पूर्ण 9 दिवसांची असेल. 22 मार्च 2023 पासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होत आहे. नवरात्रीमध्ये दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते.
				  													
						
																							
									  
	 
	चैत्र नवरात्रीमध्ये शुभ योग
	23 मार्च, 27 मार्च आणि 30 मार्च या तीन दिवशी सिद्धी योग. 
				  				  
	27 आणि 30 मार्च रोजी अमृत सिद्धी योग देखील. 
	24 मार्च, 26 मार्च आणि 29 मार्च या तीन दिवशी रवि योग. 
				  											 
						
	 
							
							 
							
 
							
						
						 
																	
									  
	नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी अर्थातच रामनवमीच्या दिवशी गुरु पुष्य योग असेल. 
	 
	चैत्र नवरात्री 2023 घटस्थापना शुभ मुहूर्त
				  																								
											
									  
	चैत्र नवरात्रीच्या घटस्थापनेच्या शुभ मुहूर्ताची सुरुवात 22 मार्च रोजी सकाळी 06.23 ते 07.32 (कालावधी 01 तास 09 मिनिटे) असेल. चैत्र नवरात्री प्रतिपदा तिथी 21 मार्च 2023 रोजी रात्री 10:52 वाजता सुरू होत आहे आणि प्रतिपदा तिथी 22 मार्च 2023 रोजी रात्री 08:20 वाजता समाप्त होईल.
				  																	
									  
	 
	चैत्र नवरात्रीच्या तारखा आणि माळ
	घटस्थापना - 22 मार्च 2023 गुढीपाडवा
	चैत्र नवरात्रीची पहिली माळ : शैलपुत्री देवी पूजा 
				  																	
									  
	23 मार्च 2023 चैत्र नवरात्रीची दुसरी माळ : ब्रह्मचारिणी देवी पूजा 
	24 मार्च 2023 चैत्र नवरात्रीची तिसरी माळ : चंद्रघंटा देवी पूजा
				  																	
									  
	25 मार्च 2023 चैत्र नवरात्रीची चौथी माळ : कुष्मांडा देवी पूजा
	26 मार्च 2023 चैत्र नवरात्रीची पाचवी माळ : स्कंदमाता देवी पूजा
				  																	
									  
	27 मार्च 2023 चैत्र नवरात्रीची सहावी माळ : कात्यायनी देवी पूजा 
	28 मार्च 2023 चैत्र नवरात्रीची सातवी माळ कालरात्री देवी पूजा 
				  																	
									  
	29 मार्च 2023 चैत्र नवरात्रीची आठवी माळ महागौरी देवी पूजा
	30 मार्च 2023 राम नवमी चैत्र नवरात्रीची नववी माळ : सिद्धिदात्री देवी पूजा
				  																	
									  
	 
	चैत्र नवरात्री महत्त्व
	चैत्र नवरात्रीत घरात पूजन केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. चारी नवरात्रीचे उद्देश्य वेगवेगळे आहेत. पुराणांमध्ये चैत्र नवरात्रीला आत्मशुद्धी आणि मुक्तीचा आधार मानले आहे. तसेच शारदीय नवरात्रीला वैभव आणि भोग प्रदान करणारे मानले जाते.
				  																	
									  
	 
	तसेच गुप्त नवरात्रीला तंत्र क्रियांशी जुळलेले लोकं अधिक पुजतात. या दरम्यान तांत्रिक आणि इतर धर्म-कर्म याने जुळलेले लोकं साधना करतात. या दरम्यान केलेले टोने-टोटके प्रभावी असतात.
				  																	
									  
	 
	चैत्र नवरात्री म्हणजे या नऊ दिवस लोकं उपवास ठेवून आपली भौतिक, शारीरिक, आध्यात्मिक आणि तांत्रिक इच्छा पूर्ण करण्याची कामना करतात. या दिवसांमध्ये ईश्वरीय शक्ती उपासकासोबत असते आणि त्यांची प्रत्येक मनोकामना पूर्ण करण्यास मदत करते.
				  																	
									  
	 
	ज्योतिषीय दृष्ट्या विशेष महत्त्वपूर्ण चैत्र नवरात्रीत सूर्याचे राशी परिवर्तन होतं आणि या दरम्यान सूर्य मेष मध्ये प्रवेश करतो. चैत्र नवरात्रीपासून नववर्ष पंचांगाची गणना सुरू होते. सूर्याच्या मेष राशीत प्रवेश इतर सर्व राशींवर प्रभाव टाकतं.
				  																	
									  
	 
	नवरात्रीत नऊ दिवस खूप शुभ असल्याचे असे मानले जाते. या दरम्यान कुठलेही शुभ कार्य अगदी विचार न करता आणि मुर्हूत न बघता देखील करता येतात. कारण पूर्ण सृष्टीला आपल्या मायेने पांघरणारी आदिशक्ती या काळात पृथ्वीवर असते.
				  																	
									  
	 
	चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून हिंदू नववर्षाची सुरुवात होते. तिसर्या चैत्र नवरात्रीत प्रभू विष्णूंनी मत्स्य रूपात पृथ्वीची स्थापना केली होती. नंतर प्रभू विष्णू प्रभू राम या रूपात देखील चैत्र नवरात्रीत प्रकट झाले होते. म्हणून या दिवसांचे खूप महत्त्व आहे.
				  																	
									  
	 
	चैत्र नवरात्रीत हवन पूजन आणि आरोग्याचे खूप फायदे आहेत. या दरम्यान चारी नवरात्र ऋतूंच्या संधीकाळात असतात अर्थात या दरम्यान हवामान बदलते. या कारणामुळे व्यक्ती मानसिक रूपाने स्वत:ला कमजोर जाणवतो. 
				  																	
									  
	 
	मनाला पूर्वीप्रमाणे दुरुस्त करण्यासाठी व्रत करतात.