शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. नवरात्रौत्सव
Written By
Last Updated : शुक्रवार, 1 ऑक्टोबर 2021 (18:29 IST)

नवरात्र विशेष : नवदुर्गेच्या उत्सवाला नवरात्र का म्हणतात

हिंदू धर्मात असे बरेच सण आहे ज्यांचा मध्ये रात्री शब्दाचा उल्लेख केला आहे. जसे नवरात्र आणि शिवरात्र. वर्षात चार नवरात्र असतात. चार मधून दोन या गुप्त नवरात्र आणि दोन सामान्य असतात. सामान्य नवरात्रांत पहिले नवरात्र चैत्र महिन्यात येतं आणि दुसरे नवरात्र आश्विन महिन्यात येतं. आषाढ आणि माघ महिन्यात गुप्त नवरात्र येतं. गुप्त नवरात्र हे तांत्रिक साधनेसाठी असतात. तर सामान्य नवरात्र हे आध्यात्मिक साधनेसाठी असतं. 
 
1 नवरात्रात नवरात्र शब्दाने 'नव अहोरात्रांचा '(विशेष रात्री)' बोध होतो. 'रात्र हे शब्द सिद्धीचे प्रतीक आहे. भारतातील ऋषी-मुनींनी रात्रीला दिवसापेक्षा अधिक महत्त्व दिले आहे. हेच कारण आहे की दिवाळी, होळी, शिवरात्र आणि नवरात्राचे सण रात्रीच साजरे करतात. जर रात्रीचे कोणतेही गूढ नसते तर या सणांना रात्र नसून दिवस म्हटले गेले असते. जसे नवदिन, शिवदिन, पण आपण असे म्हणत नाही. शैव आणि शक्तीशी निगडित असलेल्या धर्मात रात्रीचे महत्त्व आहे तर वैष्णव धर्मात दिवसाला महत्त्व आहे. म्हणून या रात्री मध्ये सिद्धी आणि साधना किंवा ध्यान केले जाते (या रात्री केलेले शुभ संकल्प सिद्ध असतात). 
 
2 हे नवरात्र ध्यान, साधना, उपवास, नियम, यज्ञ, तंत्र, त्राटक, योग, इत्यादी साठी महत्त्वाचे आहे. काही साधक संपूर्ण रात्र पद्मासन किंवा सिद्धासनात बसून आंतरिक किंवा बीजमंत्राचे जप करून विशेष सिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करतात, कारण या दिवसात निसर्ग नवीन होऊ लागतो. म्हणून या रात्री शब्दात नव शब्द जोडले आहे. निसर्ग वर्षातून चार वेळा आपले रूप बदलून स्वतःला नवे करतो. निसर्गाच्या बदलचे हे काळ महत्त्वाचे असतात. वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघावं तर पृथ्वीद्वारे सूर्याच्या प्रदक्षिणेच्या काळात एका वर्षात चार ऋतू असतात. त्या पैकी मार्च आणि सप्टेंबरच्या महिन्यात दोन मुख्य नवरात्र पडतात. या काळात जंतांचा धोका संभवतो. ऋतूंच्या बदल मुळे शारीरिक आजार वाढतात. अश्या वेळी नवरात्राचे पालन करून हे टाळता येतं.
 
3 रात्री मध्ये निसर्गाचे बरेच अडथळे संपतात. आपण लक्ष दिले असल्यास रात्री आपली आवाज लांब पर्यंत ऐकू येते पण दिवसात नाही, कारण दिवसात इतर आवाज येतं असतात. आणि गोंगाट देखील जास्त असतो. या मागील एक अजून कारण आहे की दिवसात सूर्य किरण आवाजाच्या लहरींना आणि रेडियोच्या लहरींना पुढे वाढण्यापासून रोखते. रेडियो ह्याचा प्रत्यक्ष उदाहरण आहे की रात्रीच्या वेळी त्याची फ्रिक्वेन्सी स्वच्छ असते. हे नवरात्र तर अधिक महत्त्वपूर्ण असतात, कारण आपण या इथरच्या माध्यमाने सहजपणे जुळून सिद्धी मिळवू शकतो. आपले ऋषी-मुनींनी हजारो -लाखा वर्षा पूर्वी निसर्गाच्या या वैज्ञानिक रहस्यांना जाणून घेतले होते.
 
4 रेडियोच्या लाटा प्रमाणे आपल्याद्वारे उच्चारलेले मंत्र इथर माध्यमाने पोहोचून शक्तीला संचयित करतात किंवा शक्तीला जागृत करतात. याच गूढाला समजण्यासाठी संकल्प आणि उच्च अवधारणासह आपल्या शक्तिशाली विचार तरंगांना वायुमंडळात पाठवून साधने आपल्या कार्य सिध्दी करण्यात यशस्वी होतात. 
 
गीता मध्ये म्हटले आहे की हे विश्व एका उलट्या झाडासारखे आहेत म्हणजे ह्याचे मूळ वर आहे. आपणांस काही ही मागायचे असल्यास वरून मागावं. पण तिथं पर्यंत आपली आवाज दिवसात पोहोचू शकत नाही हे रात्रीच शक्य असतं. देवी आईची देऊळे डोंगरावर असण्याचे कारण देखील हेच आहे.