रविवार, 5 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. नवरात्रौत्सव
Written By वेबदुनिया|

नऊ दिवस कसे करावे कन्या पूजन

देवीव्रतांमध्ये 'कुमारीपूजन' परमावश्यक मानले गेले आहे. शक्य तर नवरात्र संपेपर्यंत, नाही तर समाप्तीच्या दिवशी कुमारीचे पाय धुऊन तिची गंधपुष्पा‍दींनी पूजा करावी. तिला मिष्टान्न भोजन वाढावे. 
 
एका कुमारिकेचे पूजन केले असता ऐश्वर्यप्राप्ती होते. 
 
दोघींचे पूजन केले असता भोग व मोक्षप्राप्ती होते. 

 
WD
तिघींचे पूजन केल्याने धर्म-अर्थ-काम यांची प्राप्ती होते. 
 
चौघींच्या पूजनाने राज्यपदप्राप्ती. 
 
पाच जणीचे पूजन केल्याने विद्याप्राप्ती. 
 
सहांच्या पूजनाने षटकर्मसिद्धी. 
 
सातांच्या पूजनाने राज्यप्राप्ती.

 
WD
आठजणींच्या पूजेने संपत्ती आणि 
 
नऊ कुमारींची पूजा केली असता पृथ्वीचे राज्य मिळते. 
 
दोन वर्षांची मुलगी कुमारी, तीन वर्षांची त्रिमूर्तिनी, चार वर्षांची कल्याणी, पाच वर्षांची रोहिणी, सहा वर्षांची काली, सात वर्षांची चण्डिका, आठ वर्षांची शांभवी, नऊ वर्षांची दुर्गा आणि दहा वर्षांची सुभद्रा-स्वरुपिणी संबोधिली जाते. कुमारीपूजनसाठी याहून मोठी मुलगी अग्राह्य होय.