मंगळवार, 31 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. नवरात्रौत्सव
Written By
Last Modified: सोमवार, 26 सप्टेंबर 2022 (16:13 IST)

घटस्थापना : उत्साह संचारे अशी वेळ नवरात्रीची

navratri
आई आली  ग घटी तुझ्या जगराची,
उत्साह संचारे अशी वेळ नवरात्रीची,
दैत्य सारे चळचळ कापतील, कोप तुझा पाहता,
हाती शस्त्र तुझ्या, परी मनी कोमलता,
कर दुष्ट प्रवृत्ती चा संहार, कर कृपा देवी,
तुझ्या जवळील ही शक्ती, जरा मलाही द्यावी,
अन्याया विरुद्ध लढण्याचे बळ अंगी द्यावे,
माणसातील राक्षसांना मी ओळखाया शिकावे,
करवून घे ग माते सेवा तू माझ्याकरवी,
प्रकट होउनीया या धरेवर, कृपा तू करावी!!..
..अश्विनी थत्ते.