शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. नवरात्रौत्सव
Written By
Last Updated : सोमवार, 26 सप्टेंबर 2022 (08:07 IST)

Shardiya Navratri 2022: घटस्थापनापूर्वी, यादीत या पूजा साहित्याचा समावेश करा

shakambhari purnima
Navratri Puja Samagri List:  नवरात्रीच्या काळात माँ दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा मोठ्या विधींनी केली जाते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अनेकजण घटस्थापना करतात. घटस्थापनेला उपासनेत खूप महत्त्व आहे. घटस्थापनेत भरपूर साहित्य लागते. पूजेचे साहित्य लक्षात ठेवून घेतल्यावर देखील काही साहित्य ठेवायचे राहते. असं होऊ नये या साठी पूजेच्या साहित्याची एक यादी तयार करा, जेणे करून घटस्थापनाच्या वेळी त्याची कमतरता होऊ नये. चला तर मग जाणून घेऊ या.
 
सर्वप्रथम देवीची सुंदर सजावट करावी. लाल चुनरी, मेंदी, कुमकुम, लाल बिंदी आणि लाल बांगड्या, शेंदूर, आरशा, या सर्व वस्तूंचा समावेश आईच्या शृंगारासाठी करा. लाल रंगाची साडी देखील खरेदी करू शकता. हे सर्व साहित्य खरेदी केल्यानंतर चौरंगावर लाल वस्त्र अंथरून देवीची मूर्ती ठेवा. 
 
घटस्थापना याला कलश स्थापना देखील म्हणतात. हिंदू धार्मिक ग्रंथानुसार कलशाची स्थापना केल्याने देवीआई सौख्य आणि ऐश्वर्य  प्रदान करते.
 
 कलशाच्या मुखात भगवान विष्णू वास करतात आणि देवी आई  कलशाच्या मध्यभागी वास करते असे मानले जाते. नवरात्रीमध्ये कलशाची स्थापना केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते.
 
घटस्थापनापूर्वी हे पूजेचे साहित्य गोळा करावे. मातीवर पेरण्यासाठी गहू किंवा ज्वारी लागेल, धान्यची  पेरणीसाठी स्वच्छ स्वच्छ माती गोळा करावी लागेल.
 
घटस्थापनासाठी मातीचा कलश वापरू शकता  पितळ, किंवा चांदीचा कलश वापरू शकता. शुद्ध पाणी, गंगाजल, रोळी, कलावा , सुपारी, कलश, दुर्वा, कलश झाकण्यासाठी मातीचे किंवा तांब्याचे झाकण, कलशात ठेवायचे नाणे,नागलीची किंवा  आंब्याची पाने,  तांदूळ, फुले, नारळ, दोन प्रकारची फळे, आईला अर्पण करण्यासाठी मिठाई, दिवा, अगरबत्ती.हे सर्व पूजेचे साहित्य गोळा करून घटस्थापना विधिपूर्वक करावी.