बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. नवरात्रौत्सव
Written By
Last Modified: शनिवार, 9 ऑक्टोबर 2021 (12:21 IST)

उपांग ललिता पंचमी व्रत पूजा विधी

आश्विन शुक्ल पंचमीला उपांग ललि‍तादेवीची पूजा केली जाते. पार्वती देवीला शक्ती म्हटले जाते, म्हणून शक्तीच्या रूपात पार्वतीला ललिता देवी म्हणून पूजले जाते. ललिता देवीला त्रिपुरा सुंदरी म्हणूनही ओळखले जाते. शारदीय नवरात्रीच्या पाचव्या दिवशी ललिता पंचमीची पूजा केली जाते. लोक या दिवशी उपवास करतात. मुख्यतः हा सण गुजरात आणि महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा सण उपंग ललिता पंचमी व्रत आणि ललिता जयंती म्हणूनही ओळखला जातो. कामदेवच्या शरीराच्या राखेतून निर्माण झालेल्या भंडा राक्षसाला मारण्यासाठी आई ललिताचा जन्म झाला.
 
ललिता पंचमी व्रत पूजा पद्धत
ललिता पंचमीच्या दिवशी एखाद्या पवित्र नदीत स्नान करावे आणि तेथील वाळू एखाद्या बांबूच्या भांड्यात घरी आणावी. 
या वाळूला ललिता देवीचे रूप देऊन त्याची पूजा करावी. 
खालील मंत्राने 28 वेळा फुले आणि तांदूळ अर्पण करावे -
 
ललिते ललिते देवि सौख्यसौभाग्यदायिनी।
या सौभाग्यसमुत्पन्ना तस्यै देव्यै नमो नमः॥
 
देवीला फळे अर्पण करावे.
दिवसा उपवास ठेवा आणि रात्री जागरण करावं आणि दुसऱ्या दिवशी मूर्तीचे विसर्जन करावं.
घरी हवन करावं नंतर 15 ब्राह्मण आणि 15 मुलींना भोजन घालावं.
ललिता पंचमीच्या दिवशी ललिता सहस्रनाम आणि ललिता त्रिशतीचे पठण करावे.
 
ललिता पंचमी व्रत महत्व Significance Of Lalita Panchami Vrat
असे मानले जाते की जर एखाद्या भक्ताने या दिवशी मा ललिताचे व्रत केले तर त्याला माता भगवतीचा आशीर्वाद मिळतो आणि इच्छित आशीर्वाद मिळतात. जीवनात नेहमी सुख, शांती आणि समृद्धी नांदते.
 
त्रिपुरा सुंदरी माता ललिताच्या दर्शनाने सर्व प्रकारचे त्रास आपोआप दूर होतात. ललिता पंचमीचे व्रत सर्व प्रकारचे सुख देणारे मानले जाते. हे व्रत भक्ताला बळ देते.
 
हेच कारण आहे की ललिता पंचमीच्या दिवशी सर्व मंदिरांमध्ये भाविकांचा ओघ असतो आणि या दिवशी जत्रांचे आयोजन केले जाते. लाखो लोक हा दिवस मोठ्या आनंदाने साजरा करतात.