बुधवार, 4 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. नवरात्र 2024
  3. नवरात्र उत्सव
Written By

Navratri 2024 Wishes Marathi नवरात्रीच्या शुभेच्छा

Navratri 2022 wishes
कुंकवाचा पावलांनी आई माझी आली 
सोन्याच्या पावलांनी आई माझी आली
सर्वांच्या इच्छा करो ती पूर्ण 
नवरात्रीच्या शुभेच्छा 
 
सर्व जग आहे जिच्या चरणी 
नमन आहे त्या मातेला 
आम्ही आहोत फक्त भक्त तुझे 
तुच आहेस आमची सर्वेसर्वा, जय अंबे 
 
दुर्गामाता तुमच्यावर शक्ती, आनंद, मानवता, शांती, ज्ञान, सेवाभाव, नावलौकीक, आरोग्य आणि ऐश्वर्य 
या नऊ गोष्टींची वर्षाव करो 
आणि हा नवरात्रौत्सव तुमच्यासाठी खास ठरो हीच प्रार्थना, 
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
 
माता लक्ष्मी सर्वांच्या घरी वास करो
आणि सर्वांना सुख, समृद्धी, यश, ऐश्वर्य भरभरून मिळो
हीच देवीकडे प्रार्थना…
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
 
लाल रंगाने सजला दरबार मातेचा 
आनंदी झालं मन, सुखी झालं जग 
शुभ होवो तुमच्यासाठी ही नवरात्री 
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.
 
देवी आई वरदान दे
फक्त थोडं प्रेम दे 
तुझ्या चरणी आहे सर्वकाही 
फक्त तुझा आशिर्वाद दे.
 
शक्तीची देवता दुर्गामाता आपणा सर्वांना सुख, समृद्धी, समाधान व यश प्राप्तीसाठी आर्शीवाद देवो हीच देवीचरणी प्रार्थना… 
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
 
माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सतत बरसत राहो 
आणि तुमचे जीवन आनंदमय होवो 
हीच मातेकडे प्रार्थना… 
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
 
नवरात्री म्हणजे
न – नवचेतना देणारी
व – विघ्नांचा नाश करणारी
रा – राजसी मुद्रा असलेली
त्री- तिन्ही त्रिभूवनी वास करणारी
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
 
तूच लक्ष्मी, 
तूच दुर्गा, 
तूच भवानी, 
तूच अंबा, 
तूच जगदंबा, 
तूच जिवदानी…
एकच शक्ती अनेक रूपांतूनी तुच जगी अवतरली…
शुभ नवरात्री !
 
लक्ष्मीचा हात असो
सरस्वतीची साथ असो 
गणपतीचा वास असो 
आणि मां दुर्गेचा आशिर्वाद असो 
नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा
 
नवा दीप उजळो, 
नवी फुल उमलोत, 
नित्य नवी बहार येवो, 
नवरात्रीच्या या शुभ दिवशी तुम्हावर 
देवीचा आशिर्वाद राहो, 
शुभ नवरात्री. 
 
सर्व जग जिच्या शरणात आहे, 
नमन त्या आईच्या चरणी आहे, 
आम्ही आहोत तिच्या पायांची धूळ, 
चला मिळून देवीला वाहूया श्रद्धेचं फूल, 
घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा
 
आईचं हे पर्व घेऊन येतं
हजारो-लाखों आनंदाचे क्षण 
या वेळी आई करू दे 
सर्वांची इच्छा पूर्ण 
घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा