गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. नवरात्रि 2022
  3. नवरात्रि रेसिपी
Written By
Last Modified: शनिवार, 24 सप्टेंबर 2022 (14:35 IST)

Navratri 2022 Prasad नवरात्री 9 दिवसांचे 9 प्रसाद

9 prasad of navratri
नवरात्रीत 9 दिवस नवदुर्गेला 9 प्रकारचे प्रसाद अर्पण करण्याचे फायदे-

प्रतिपदेला गाईच्या तुपापासून बनवलेल्या मिठाईचा नैवेद्य लावल्याने रोगांपासून मुक्ती मिळते.
 
द्वितीयेला पंचामृताचा नैवेद्य दाखवल्याने वय वाढते.
 
तृतीयेला दुधाचा अभिषेक आणि दुग्धजन्य पदार्थ अर्पण केल्याने दुःखापासून मुक्ती मिळते.
 
चतुर्थीला मालपुआच्या नैवेद्याने बुद्धीचा विकास होतो.
 
पंचमीला केळीचा नैवेद्य दाखवल्याने आरोग्यास लाभ होतो.
 
षष्ठीला मधाचा नैवेद्य दाखवल्याने व्यक्तीमध्ये आकर्षण वाढते.
 
सप्तमीला गुळाचा नैवेद्य दाखवल्याने संकटे नष्ट होतात.
 
अष्टमीला खीर किंवा नारळ अर्पण करणे मुलासाठी चांगले असते.
 
नवमी तिथीला खीर किंवा हलव्याचा नैवेद्य दाखवल्याने सुख-समृद्धी येते.