Navratri 2022: नवरात्रीच्या उपवासात कुट्टूच्या पिठाचे पकोडे बनवा, साहित्य आणि कृती जाणून घ्या
नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये लोक देवी आईची पूजा करतात. घटस्थापना आणि विधिपूर्वक पूजा करण्याबरोबरच लोक देवीचे नऊ दिवस उपवास करतात. ज्यामध्ये फक्त उपवासाचे पदार्थ खाल्ले जातात. उपवासाच्या नऊ दिवसांत पोट भरण्याबरोबरच स्वादिष्ट असे काही खावेसे वाटते. तर कुट्टूच्या पिठापासून बनवलेले पकोडे करून पहा. कुट्टुचे पीठ आणि बटाटे मिसळून तयार केलेले हे पकोडे नवरात्रीच्या वेळी पाहुण्यांना खायलाही देऊ शकता. तसेच, ते पूर्णपणे उपवासाचे आहे. जे खाल्ल्याने ऊर्जा तर मिळेलच तसेच नवरात्राच्या उपवासाची भूकही भागेल. चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या.
साहित्य-
एक वाटी कुट्टूचे पीठ, दोन ते तीन हिरव्या मिरच्या, हिरवी कोथिंबीर बारीक चिरून, दोन ते तीन उकडलेले बटाटे, सेंधव मीठ, भाजलेले जिरे, लाल तिखट, काळी मिरपूड,.तळण्यासाठी साजूक तूप किंवा शेंगदाणा तेल.
कृती-
सर्वप्रथम बटाटे उकळून घ्या. नंतर हे बटाटे सोलून घ्या. एका भांड्यात सोललेले बटाटे चांगले मॅश करा. लक्षात ठेवा बटाटे थंड झाल्यावरच मॅश करा. मॅश बटाट्यामध्ये काळी मिरपूड, लाल तिखट, बारीक चिरलेल कोथिंबीर जिरेपूड घालून सर्व गोष्टी व्यवस्थित मॅश करा. सर्व साहित्य बटाट्यात मॅश झाल्यावर त्यात सेंधव मीठ टाका.
पकोड्यांसाठी एका भांड्यात कुट्टूचं पीठ घ्या. त्यात थोडेसे सेंधव मीठ आणि काळी मिरपूड घाला. नीट मिक्स झाल्यावर त्यात पाणी घालून पातळ पीठ तयार करा. आता गॅसवर पॅन ठेवा आणि तेल घालून गरम करा. थोडेसे मॅश केलेले बटाटे घ्या आणि त्यांना गोल आकार द्या. हे गोल आकाराचे बटाट्याचे मिश्रण कुट्टूच्या पिठात बुडवून तेलात घातल्यावर मध्यम आचेवर तळून घ्या. त्याचप्रमाणे सर्व पकोडे तयार करून सोनेरी रंग होईपर्यंत तळून घ्या. कुट्टूच्या पिठाचे पकोडे तयार आहेत. कोथिंबिरीच्या उपवासाच्या चटणीसोबत गरमागरम सर्व्ह करा.