रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. उपवासाचे पदार्थ
Written By
Last Modified: बुधवार, 21 सप्टेंबर 2022 (11:41 IST)

शिंगाड्याचा शिरा

साहित्य- 1 वाटी शिंगाड्याचे पीठ, 1 वाटी साखर, 4 1/2 कप पाणी, 6 टेबल स्पून तूप, 1/2 टी स्पून वेलची पूड, 1 टेबल स्पून बादाम
 
कृती- एका कढईत तूप गरम करून त्यात पीठ घाला आणि सतत ढवळत असताना मध्यम आचेवर भाजून घ्या.
दुसरीकडे एका कढईत मध्यम आचेवर पाणी आणि साखर घाला.
पीठ भाजून झाले की त्यात साखरेचा पाक आणि वेलची घाला. उकळी येऊ द्या आणि पाणी पूर्णपणे अटू द्या.
या दरम्यान, हलवा सतत ढवळत राहा. 
बदामाने सजवून गरमागरम सर्व्ह करा.