1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. मोबाईल
Written By
Last Modified शुक्रवार, 10 एप्रिल 2020 (10:27 IST)

Airtel भन्नाट ऑफर : दुसऱ्यांचं रिचार्ज करा, त्वरित कॅशबॅक मिळवा

देशातील प्रमुख दूरसंचार कंपनी एअरटेलनं यूझर्ससाठी भन्नाट ऑफर काढली आहे. यात अतिरिक्त कमिशन मिळवण्याची संधी दिली आहे. यामध्ये युझर्सला दुसर्‍यांचं रिजार्ज केल्यावर त्वरित कॅशबॅक मिळणार आहे. 
 
एअरटेल थँक्स अॅपवर सुपर हिरो फिचरची सुरूवात केल्याची माहिती एअरटेलनं दिली असून यात ग्राहक सुपर हिरो म्हणून आपलं नाव नोंदवू शकतात. नोंदणी नंतर ग्राहकांना कोणत्याही अन्य एअरटेल क्रमांकाचं रिचार्ज करून देता येईल आणि प्रत्येक रिचार्जमागे कंपनीकडून कॅशबॅकही मिळेल. 
 
जर एखाद्या ग्राहकानं दुसऱ्याचा मोबाइल क्रमांक रिचार्च केला तर कापली जाणारी रक्कम ही एमआरपीपेक्षा चार टक्के कमी असेल, असं एअरटेल कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. म्हणजेच रिचार्च करणाऱ्याला प्रत्येक रिचार्जवर चार टक्क्यांचा फायदा होईल. ही रक्कम डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ज, यूपीआय, नेट बँकिंग, एअरटेल पेमेंट बँक, पेटीएम आणि अॅमेझॉन पे द्वारे भरता येऊ शकते.