सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 26 जून 2019 (12:34 IST)

जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेल देत आहे 20GB फ्री डेटा, असा घ्या फायदा

टेलिकॉम कंपन्यांमध्ये प्रतिस्पर्धा वाढत आहे. हेच कारण आहे की कंपन्या रोज रोज नवीन ऑफर वेग वेगळ्या ग्राहकांसाठी आणत आहे. प्रीपेड आणि पोस्टपेड ग्राहकांनंतर आता टेलिकॉम कंपन्या ओटीटी प्लेटफॉर्म ग्राहकांसाठी देखील ऑफर आणत आहे.   
 
ग्राहकांचे मन जिंकण्यासाठी एअरटेल काही प्रीपेड प्लान्ससोबत 20GB अतिरिक्त डेटा देत आहे. पण हा डेटा वेग वेगळ्या प्लान्सप्रमाणे वेग वेगळा आहे. हे प्लान्सप्रमाणे  5GB, 10GB आणि 20GBपर्यंत आहे. यात सर्वात जास्त पॉपुलर प्लान 399 रुपयांचा आहे ज्यात 20GB ऍडिशनल डेटा ग्राहकांना मिळतं आहे. पण यात काही नियम आणि अटी आहे.     
 
एअरटेल हे ऍडिशनल 4जी डेटा मोबाइल अकाउंटमध्ये नाही देत आहे. ऍडिशनल डेटाचा फायदा उचलण्यासाठी ग्राहकांना त्या जागेवर उपस्थित राहवे लागणार आहे, जेथे कंपनीने वायफाय झोन बनवला आहे. एअरटेल वाय-फाय जोन्स फ्री वाय-फायहॉटस्पॉट आहे, जे प्रमुख महानगरांमध्ये 500 जागांवर उपस्थित आहे. ग्राहक 20GB फ्री डेटाचा फायदा या जागेवरच उचलू शकतात.   
 
फायदा उचलण्यासाठी तुम्हाला माय एअरटेल ऐपच्या माध्यमाने वाय फाय नेटवर्कच्या माध्यमाने वाय-फाय नेटवर्कशी कनेक्ट करावे लागेल. वेरिफिकेशननंतर फ्री इंटरनेट सेवेचा फायदा उचलू शकता.