गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 22 जून 2019 (10:53 IST)

बंपर ऑफर, मारुती सुझुकीकडून मान्सूनमध्ये फ्री सर्विस सुरु

Bumper offer
मारुती सुझुकी इंडीयाने आपल्या ग्राहकांसाठी बंपर ऑफर आणली आहे. यामध्ये मारुतीच्या ग्राहकांसाठी मोफत सर्विस मिळणार आहे. मारुतीच्या ऑथोराइज्ड सर्विस सेंटरमध्ये या संधीचा लाभ घेता येणार आहे. मारुतीची ही ऑफर 20 जून ते 20 जुलैपर्यंत सुरु असणार आहे. एक महिना चालणाऱ्या या ऑफरमध्ये हेल्थ चेकअप कॉम्प्लीमेंट्री देण्यात येणार आहे. मान्सूनमध्ये कारमध्ये कोणत्या प्रकारची गडबड होऊ नये यासाठी ही ऑफर असल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात येत आहे. मारुतीने गेल्यावर्षी मान्सूनमध्ये फ्री सर्विस दिली होती.
 
या ऑफरमध्ये ग्राहकांना कारच्या सर्व पार्ट्स आणि एसेससरीजवर डिस्काऊंट दिले आहे. याशिवाय ब्रेक्स, विंड स्क्रीन, वायपरब्लेड, बॅटरी. टायर, इलेक्ट्रीक सिस्टिम संदर्भातील कंपोनेंट्सची सर्विस पूर्णपणे फ्री देण्यात येणार आहे. यासाठी ग्राहकांनाकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क वसूल करण्यात येणार नाही. जर कोणता पार्ट किंवा कोणते डेमेज पार्ट बदलायचा असेल त्याचाच चार्ज ग्राहकांना द्यावा लागेल. त्यावरही कंपनीतर्फे डिस्काऊंट दिला जाणार आहे.