1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

केंद्राने बंद केले कांद्यांचे १० टक्के अनुदान

शेतकरी वर्गासाठी मोठी बातमी आहे. यानुसार आता कांदा निर्यातीवर मिळणारे अनुदान केंद्र सरकारने काढून टाकले आहे. देशात  निर्यातीला प्रोत्साहन मिळण्यासाठी डिसेंबर महिन्यापासून लागू झालेले अनुदान सहा महिन्यात बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मागील वर्षी कांद्याला केंद्रसरकार अनुदान देत होते. आता ते अनुदान बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.भविष्यात निर्यातीवर विपरीत परिणाम होऊन बाजारभाव पुन्हा कोसळण्याची शक्यता शेतक-यांनी व्यक्त केली आहे. यंदा कांद्याचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात घटले आहे.

या आगोदर पाऊस कमी असल्याने आणि इतर गोष्टींमुळे शेतकरी मोठ्या अडचणीत होता. रोख पैसे देणारे उत्पादन म्हणून कांदा पिकाकडे पाहिले जाते मात्र आता अनुदान बंद झाल्याने परत नुकसान होईल अशी भीती शेतकरी राजाला लागली आहे. यावर्षी जर मान्सून चांगला झाला नाही तर मग शेतकरी मोठ्या अडचणीत सापडणार आहे.