शुक्रवार, 8 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 15 जून 2019 (10:23 IST)

एटीएएममध्ये कॅश नाही मग बॅंकेना पेनल्टी

There is no cash in ATM and then the bank has a penalty
आता बॅंकाचे एटीएएम आता जास्त काळ कॅशलेस राहणार नाहीत. रिझर्व बॅंक ऑफ इंडीयाने यासंदर्भातील निर्देश जारी केले आहेत. तीन तासांपेक्षा जास्त काळ बॅंक एटीएम कॅशलेस न ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. असे झाल्यास बॅंकेवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. छोटी शहरे आणि ग्रामीण भागांतील एटीएममध्ये कित्येक दिवस कॅश नसल्याच्या तक्रारी येतात. छोट्यात छोटी रक्कम काढण्यासाठी नागरिकांना बॅंकांच्या रांगेत उभे राहावे लागते.
 
बॅंकांच्या एटीएममध्ये असलेल्या सेंसरच्या माध्यमातून रियल टाईमवर किती रक्कम उपलब्ध आहे याची माहिती मिळते. एटीएममधील कॅशच्या ट्रेमध्ये किती कॅश आहे हे बॅंकांना यावरून कळते. कधी एटीएएम रिफिलिंग करायचे आहे हे बॅंकांना यावरून कळते. पण असे असतानाही बॅंका याकडे दुर्लक्ष करतात. छोटे शहर किंवा ग्रामीण भागात बॅंकींग करस्पॉंन्डंटकडे पाठवले जाते. त्यामुळे आता तीन तासाहून अधिक वेळ जर एटीएएममध्ये कॅश नसेल तर बॅंकेवर पेनल्टी लागेल. ही पेनल्टी प्रत्येक विभागाप्रमाणे वेगवेगळी असेल.