बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएल कडे पैसे नाहीत, तर पगार कोठून देणार

सरकारी दूरसंचार कंपनी असलेल्या बीएसएनएलने सरकारकडे मदतीची विनंती केली आहे.यामध्ये कंपनीने पुढे कामकाज सुरु ठेवण्यात असमर्थता असून, त्यांच्याकडे रोख रकमेची कमतरता असल्यामुळे कंपनी कर्मचाऱ्यांना 850 कोटी रुपयांचा जूनचा पगार देण्यात असमर्थ आहे असे स्पष्ट केले आहे. 
 
सोबतच कंपनीवर तब्बल 13 हजार कोटी रुपयांची थकबाकी असल्याने सध्या बीएसएनएलचा व्यवसाय अस्थिर झाला आहे. बीएसएनएलचे कॉर्पोरेट बजेट अॅण्ड बँकिंग डिव्हिजनचे सीनियर जनरल मॅनेजर पूरन चंद्र यांनी दूरसंचार मंत्रालयच्या सचिवांना यासंबंधी पत्र लिहिले आहे. ते म्हणतात की दर महिन्याच्या महसूल आणि खर्चातील मोठ्अंया तरामुळे या पुढे  कंपनीचं कामकाज सुरु ठेवणं हा फार  चिंतेचा विषय बनलाय,  सध्या परिस्थिती एका अशा स्थरावर  पोहोचली आहे जिथे पुरेशा इक्विटीचा समावेश केल्याशिवाय कंपनीचं कामकाज सुरु ठेवणं जवळपास अशक्य झाले आहे." असं पूरन चंद्र यांनी पत्रात सांगितलं. त्यामुळे बीएसएनएल चे दिवाळे निघाले आहे आता उघड झाले आहे. सरकारी कंपनी असून सर्व टॉवर त्यांच्या कडे असून खासगी कंपन्या मात्र हजारो कोटी रुपये कमवत आहेत.