शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: गुरूवार, 28 जून 2018 (15:37 IST)

भारतात 4 जुलै रोजी लॉन्च होणार आहे Asus ZenFone 5Z,जाणून घ्या फीचर

भारतात जेनफोन 5 सिरींजचा सर्वात प्रिमियम स्मार्टफोन पुढील आठवड्यात लॉन्च होऊ शकतो. या फोनचे नाव Asus ZenFone 5Z आह. ईकॉमसर्स साईट फ्लिपकार्टवर याचे टीजर देखील आले आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 प्रोसेसर, एआईशी लैस असेल. कंपनीने या फोनला एमडब्ल्यूसी 2018मध्ये लॉन्च करण्यात आला होता. याचे 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 479 युरो (किमान 38,200 रुपये) आहे. अद्याप भारतात या फोनची किंमत किती राहणार आहे हे स्पष्ट झालेले नाही.
 
Asus ZenFone 5Z मध्ये 6.20 इंचेचा डिस्प्ले आहे. ही माहिती एमडब्ल्यूसी 2018च्या लाँचिंग इवेंटद्वारे माहीत झाली होती. यात डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात एक प्रायमरी कॅमेरा 12 मेगापिक्सलचा आहे जो सोनी आयएमएक्स 363 सेंसरसोबत येतो. हा एफ/1.8 अपर्चरसोबत येतो. तसेच सेकेंडरी सेंसर 8 मेगापिक्सलचा आहे जो एफ/2.2 अपर्चर आणि 120 डिग्री वाइड एंगलशी लँस आहे. सेल्फी प्रेमींसाठी 8 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये 64 जीबी इंटर्नल स्टोरेज आहे आणि गरज पडण्यास 2 टीबी पर्यंत मेमरी वाढवण्यात येऊ शकते.