शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: सोमवार, 26 ऑगस्ट 2019 (12:56 IST)

गूगल नेस्ट हबमध्ये मिळेल टचस्क्रीन डिस्प्ले आणि वूफर स्टीरियो स्पीकर्स, किंमत फक्त 9999 रु

गूगलने आपल्या नेस्ट हबला लाँच केले आहे. याची किंमत 9,999 रुपये आहे. यात बिल्ट इन स्पीकर आणि टचस्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे. हे डिस्प्ले गूगल अस्सिटेंट पार्वर्ड लेस आहे. याच्या स्मार्ट डिस्प्लेला या प्रकारे डिझाइन करण्यात आले आहे की हे 200 मिलियनपेक्षा जास्त जसे LG, ओक्टर, फिलिप्स, सिसका, श्याओमी सारख्या बर्‍याच डिवाइसला कंट्रोल करू शकतो.  
 
गूगल नेस्ट हबचा लाँचिंग ऑफर
 
ग्राहक या डिव्हाईसला फ्लिपकार्ट, टाटा क्लिक, क्रोम आणि रिलायंस डिजीटलने खरेदी करू शकतील. याची किंमत 9,999 रुपये एवढी आहे.  
या डिवाइससोबत श्याओमीच्या Mi सिक्योरिटी कॅमेर्‍याला 1,799 रुपयात खरेदी करू शकता. हे ऑफर फ्लिपकार्ट आणि टाटा क्लिकवर मिळेल.  
 
गूगल नेस्ट हबचे फीचर्स
 
गूगल नेस्ट हबमध्ये बरेच प्री-इन्स्टॉल ऐप्स जसे यूट्यूब, गूगल फोटोज, प्ले म्युझिक मिळतील. यूट्यूबच्या मदतीने या डिव्हाईसवर तुम्ही व्हिडिओ बघू शकाल. नेस्ट हबमध्ये 7-इंचेचा डिस्प्ले देण्यात आला आहे. डिव्हाईसमध्ये बिल्ट इन वूफर स्टीरियो स्पीकर्स आणि 6.5 मेगापिक्सलचा कॅमेरा देखील मिळेल. याचा वापर टॅबलेटप्रमाणे  करू शकाल. तसेच हे डिजीटल फोटो फ्रेमचे काम देखील करतो. यात मॅप, मोसमाची माहिती मिळते. कुकिंग लव्हर्सयात व्हिडिओ बघून भोजन तयार करू शकतील. तसेच हे अलार्मचे काम देखील करेल.