जगातील सर्वात फास्ट स्मार्टफोन, पडल्यावर देखील फुटणार नाही
चिपसेट निर्माता कंपनी क्वॉलकॉमने काही दिवसांपूर्वीच आपलं नवीन प्रोसेसर स्नॅपड्रॅगन 855 प्लस प्रस्तुत केले आहे. स्नॅपड्रॅगन 855 प्लस जगातील सर्वात फास्ट प्रोसेसर आहे तसेच आसुसने स्नॅपड्रॅगन 855 प्लस यासोबत जगातील पहिला स्मार्टफोन Asus ROG Phone 2 प्रस्तुत केला आहे. अशात आसुस आरओजी फोन 2 जगातील सर्वात फास्ट स्मार्टफोन असल्याचे मानलं जात आहे. तर जाणून याबद्दल विस्तृतपणे...
स्नॅपड्रॅगन 855 प्लस वैशिष्ट्ये
कंपनीच्या दाव्याप्रमाणे स्नॅपड्रॅगन 855 प्लस कोणत्याही स्मार्टफोनसाठी सर्वात पावरफुल प्रोसेसर आहे. ग्राफिक्स रेंडरिंगमध्ये हे प्रोसेसर स्नॅपड्रॅगन 855 च्या तुलनेत 15 टक्के फास्ट आहे. हे प्रोसेसर 5जी गेमिंगसाठी देखील उपयुक्त आहे. यात ग्राफिक्ससाठी एड्रेनो 640 जीपीयू देण्यात आले आहे. याची अधिकात अधिक क्लॉक स्पीड 2.96 GHz असून प्रोसेसरला 7nm प्रोसेस तंत्रज्ञानावर तयार करण्यात आले आहे. याच्या प्रोसेसरची अधिकाधिक डाउनलोडिंग क्षमता 2Gbps आहे. स्नॅपड्रॅगन 855 प्लस प्रोसेसर 192 मेगापिक्सलपर्यंत सिंगल कॅमेरा सपोर्ट करतं. तर आता जाणून घ्या जगातील सर्वात फास्ट फोनबद्दल.
Asus ROG Phone 2 स्पेसिफिकेशन
या फोनमध्ये एंड्रॉयड पाई 9.0 आधारित ROG UI देण्यात आले आहे. यात यूजर्सकडे स्टॉक एंड्रॉयडवर स्विच करण्याचा पर्याय असेल. या फोनमध्ये 6.59 इंचची फुल एचडी प्लस एमोलेड डिस्प्ले असून त्याचं रिझोल्यूशन 1080x2340 पिक्सल आहे. डिस्प्लेवर गोरिल्ला ग्लास 6 चे प्रोटेक्शन आहे. अशात फोन सहज फुटण्याची भीती नाही. या फोनमध्ये क्वॉलकॉमचे स्नॅपड्रॅगन 855 प्लस प्रोसेसर आहे ज्यात 12 जीबी पर्यंत रॅम आणि 512 जीबी पर्यंत स्टोरेज मिळेल. या फोनमध्ये फ्रंट फेसिंग स्टीरियो स्पीकर देण्यात आले आहे.
Asus ROG Phone 2 कॅमेरा
कॅमेऱ्याबद्दल सांगायचं तर फोनमध्ये 48 मेगापिक्सलचं मुख्य लेन्स आणि 13 मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा देण्यात आला आहे, कॅमेरा 125 डिग्री एरिया कव्हर करतं आणि सेल्फीसाठी फोनमध्ये 24 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
Asus ROG Phone 2 कनेक्टिव्हिटी आणि बॅटरी
कनेक्टिव्हिटीसाठी यात 4G LTE, वाय-फाय, ब्लूटूथ, वाय-फाय डायरेक्ट, एनएफसी, 3.5एमएमचा हेडफोन जॅक आहे. फोनमध्ये यूएसबी टाइप-सी चार्जिंग पोर्ट मिळेल. यात 6000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. बॅटरी क्विक चार्जिंग 4.0 ला सपोर्ट करते. फोन 240 ग्राम वजनी आहे.