बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. मोबाईल
Written By
Last Modified: सोमवार, 17 ऑगस्ट 2020 (18:47 IST)

Infinix Smart 5 ला जागतिक स्तरावर प्रक्षेपित केले गेले, जाणून घेऊ या कॅमेरा, किंमत आणि वैशिष्ट्ये

Infinix Smart 5 हा एक नवा स्मार्टफोन आहे, ज्याला जागतिक स्तरावर लॉचं केले गेले आहे. हा फोन एक मोठ्या डिस्प्लेसह आणि बाजूस पातळ बैजल्स सह सादर करण्यात आला आहे. या फोनमध्ये कॅमेरा फीचर्स खूप चांगले देण्यात आले आहे. या व्यतिरिक्त फोनमध्ये कंपनीने बरीच खास वैशिष्ट्ये(फीचर्स)दिलेली आहे. चला आम्ही आपल्याला या फोन बद्दल सविस्तार सांगत आहोत.
 
या फोनचे डिस्प्ले :
या फोनमध्ये कंपनीने 6.6 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिलेला आहे. हा फोन अँड्रॉइड 10 वर गो एडिशन वर आधारित XOS 6 सह येतो. या फोनमध्ये कंपनीने नवीन 1.8 गीगाहर्टझ प्रोसेसरचा वापर केला आहे. या फोनला 3 जीबी रॅम सह सादर करण्यात आले आहे.
 
या फोनचा कॅमेरा सेटअप :
या फोनच्या कॅमेरा सेटअपबद्दल सांगायचे म्हणजे या मध्ये कंपनीने ट्रिपल रियर कॅमेराचे सेटअप दिले आहे. ह्याचा पहिला कॅमेरा 13 मेगापिक्सलचा आहे, हा दोन QVGA कॅमेरा सेन्सर्ससह येतो. या व्यतिरिक्त या फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी कंपनीने 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिलेला आहे.
 
5,000 एमएएच ची बॅटरी
या फोनमध्ये कंपनीने 5000 एम ए एच ची एक बॅटरी दिली आहे, जी 10 वॉटच्या फास्ट चार्जिंग स्पोर्टसह येते.या फोनमध्ये कंपनीने एबीयंट लाइट सेंसर, प्रॉक्सीमीटी सेंसर आणि एक फिंगरप्रिंट सेंसर देखील दिलेले आहे. या फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी कंपनीने सर्व वैशिष्ट्यांचा(फीचर्स)समावेश केला आहे.
 
या फोनचे व्हेरियंट(रूप) आणि किंमत :
या फोनला जागतिक कंपनीने दोन व्हेरियंट(रूपात)सादर केले आहे. पहिले व्हेरियंट 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज सह येत आणि दुसरे व्हेरियंट 3 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज सह येत. या फोनमध्ये कंपनीने 256 एक्स्टर्नल (बाह्य) स्टोरेज ची सुविधा देखील दिली आहे. या फोनच्या किमतीत अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध नाही, परंतु नायजेरिया मध्ये या फोनचे 2 जीबी रॅम आणि 3जी प्रकारांचे व्हेरियंट बाजारात आणण्यात आले आहे, याची किंमत  NGN 39,500 म्हणजे सुमारे 7,800 रुपये आहे. त्यानुसार भारतात या फोनची किंमत सुमारे 8 ते 10 हजार रुपये असू शकते.