बुधवार, 28 सप्टेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified बुधवार, 12 ऑगस्ट 2020 (16:17 IST)

सोने चांदीच्या दरात मोठी घसरण

सातत्याने वाढ होणाऱ्या सोने दरात आज मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. तसेच चांदीच्या किलोच्या दरातही अनपेक्षित मोठी घट झाली आहे. दरम्यान, दिल्लीतही मोठी घसरण दिसून येत आहे. गेल्या चार दिवसांत ६००० रुपयांची घसरण झाली आहे. पुन्हा सोन्या-चांदीच्या किंमती खाली आल्या. बुधवारी दिल्लीच्या स्थानिक बाजारात सोन्याच्या किंमती १५०० रुपयांनी खाली आल्या. काही दिवसांपूर्वी सोन्याची किंमत ५६ हजार रुपयांवर पोहोचली होती, पण आजच्या घसरणीनंतर पुन्हा ते प्रति १० ग्रॅम ५० हजारांची खाली आली आहे. 
 
काल सोने दरात ५ टक्क्यांपर्यंत घसरण झाली. आजही अडीच टक्के सोने खाली आले आहे. चांदी देखील प्रतिकिलो चार हजार रुपयांच्या घसरणीसह बाजाराला सुरुवात झाली. चांदी ६३ हजार रुपये प्रति किलोच्या खाली किंमत आली आहे. याआधी चांदीचा दर ७६ हजार रुपये किलोचा भाव होता. हा विक्रमी दर होता. मंगळवारी चांदी १२ टक्क्यांनी घसरली.