बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By

10 सप्टेंबर रोजी होईल ऍपलचा इवेंट, लाँच होईल iPhoneचे 11 सिरींज

Apple ने 10 सप्टेंबर रोजी होणार्‍या इवेंटसाठी मीडिया इनवाइट पाठवले आहे. ऍपलचा हा इवेंट 10 सप्टेंबर रोजी सिलिकॉन वेली कँप्समध्ये होणार आहे. या इवेंटमध्ये आयफोनचे 11 सिरींज लाँच होणार आहे. सांगायचे म्हणजे प्रत्येक वर्षी ऍपलचा हा इवेंट ख्रिसमस हॉलिडे शॉपिंग सीझनच्या अगोदर होतो.  
 
10 सप्टेंबर रोजी आयोजित होणार्‍या या इवेंटमध्ये iPhone 11 चे लाँच होण्याची उमेद आहे. सांगायचे म्हणजे या वर्षी देखील मागच्या वर्षाप्रमाणे आयफोन 11 सिरींजप्रमाणे तीन आयफोन सादर करण्यात येतील.  
 
महत्त्वाचे म्हणजे काही दिवसांअगोदर आयओएस 13चे बीटा वर्जनच्या कोडमध्ये एक स्क्रीनशॉट समोर आला होता ज्यात 10 सप्टेंबरची तारीख दिसत होती. स्क्रीनशॉटमध्ये  "HoldForRelease" लिहिलेले होते.   
 
या स्क्रीनशॉटचे समोर आल्यानंतर असे सांगण्यात येत आहे की 10 सप्टेंबरलाच ऍपलचे इवेंट होईल, कारण मागच्या वर्षी बीटा वर्जनमध्ये 12 सप्टेंबरची तारीख होती आणि त्याच दिवशी तीन नवीन आयफोन लाँच झाले होते ज्यात आयफोन XR देखील सामील होता.  
 
आतापर्यंत समोर आलेल्या लीक रिपोर्टानुसार iPhone 11 Pro आणि iPhone 11 Pro Max मध्ये ट्रिपल लेस कॅमेरा सेटअप असेल. त्याशिवाय या दोन्ही आयफोनमध्ये ऍपलचा A13 बायोनिक प्रोसेसर असेल.