शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By

जिओ ऑफर, जुन्या फोनवर देखील मिळेल 2,200 रुपये कॅशबॅक

रिलायंस जिओने पुन्हा ग्राहकांसाठी एक ऑफर काढली आहे. आतापर्यंत जिओसकट अनेक टेलीकॉम कंपन्या नवीन स्मार्टफोनसह कॅशबँक ऑफर देत होती, यासोबतच फ्री डाटा देखील मिळत होता परंतू आता रिलायंस जिओने एक पाऊल पुढे टाकत जुन्या फोनवर देखील 2,200 रुपये कॅशबॅक देण्याची घोषणा केली आहे. तर जाणून घ्या या ऑफरबद्दल:
 
जिओ आणि ई-कॉमर्स साइट क्विकर यांच्या भागीदारी अंतर्गत ग्राहकांना रिफर्बिश्ड स्मार्टफोनवर कॅशबॅक ऑफर मिळेल. आपण क्विकरने कोणताही रिफर्बिश्ड स्मार्टफोन खरेदी केल्यास जिओ आपल्याला 2,200 रुपये कॅशबँक देईल, तसेच ही ऑफर केवळ 4जी वीओएलटीई स्मार्टफोनवर आहे.
 
या ऑफरचा उपभोग करण्यासाठी आपल्याला 198 रुपये किंवा 299 रुपयांचा रिचार्ज करवावे लागेल. या ऑफरसाठी क्विकरवर एक नवा पेज आहे ज्याचे नाव जिओ ऑफर क्विकर बाजार असे आहे.
 
जिओचे कॅशबॅक आपल्याला माय जिओ अॅपमध्ये रिचार्ज कूपन्सच्या रुपात मिळेल. 
 
आपण क्विकरने वीवो, मोटोरोला, ऐप्पल, नोकिया, कूलपैड सारख्या कंपन्यांचे रिफर्बिश्ड स्मार्टफोन खरेदी करु इच्छित असाल तर आपल्याला जिओकडून 2,200 रुपये कॅशबँक मिळेल. ऑफर 29 नोव्हेंबरपासून सुरु आहे.