शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

जिओ ऑफर: अॅप्पल वॉच सीरीज-3 ची विक्री सुरू

दुनियाची सर्वात मोठे मोबाइल डेटा नेटवर्क, जिओने शुक्रवारपासून अॅप्पल वॉच सीरीज-3 (जीपीएस + सेल्युलर) विक्री सुरू केली आहे. अॅप्पल दुनियेतील पहिली अशी घड्याळ आहे जी सेल्युलर सेवेशी जुळलेली आहे. कस्टमर कुठूनही आणि कधीही आपल्या मित्रांशी व नातेवाइकांशी जुळू शकतो.
 
अॅप्पल वॉच सीरीज-3 च्या ग्राहकांसाठी जिओ JioEverywhereConnect सेवा सुरू करत आहे. ही सेवा त्यांच्या सर्व प्रीपेड आणि पोस्टपेड ग्राहकांसाठी मोफत उपलब्ध होणार. अॅप्पल वॉच सीरीज-3 (जीपीएस + सेल्युलर) जिओची वेबसाइट, रिलायंस डिजीटल आणि जिओ स्टोअर्सवर उपलब्ध आहे. 
 
आयफोन आणि अॅप्पल वॉच सीरीज-3 (जीपीएस + सेल्युलर) दोन्हीवर जिओ यूजर्स कॉल करण्यास व रिसीव्ह करण्यासाठी एकच नंबर वापरू शकतील. सोबतच ते दोन्ही डिव्हाईसवर डेटा आणि अॅप्लिकेशन देखील वापरू शकतील. ग्राहक आयफोन, अॅप्पल वॉच सीरीज-3 याहून दूर असल्यावरही सर्व्हिस काम करेल.
 
जिओ प्रवक्त्याप्रमाणे अॅप्पल वॉच सीरीज 3 एक उन्नत सेल्युलर तकनीक आहे आणि हे 4 जी नेटवर्कवर काम करण्यासाठी डिझाइन केले गेले आहेत. भारतात जिओ एकमेव ऑल-4 जी नेटवर्क आहे, जे अॅप्पल वॉचसाठी उत्तम आहे. जिओ पॅन-इंडिया 4 जी-डेटा आणि व्हॉईस सर्व्हिसेस (वोल्ट) देणारा एकमेव नेटवर्क आहे जे एक अद्वितीय अनुभव देतं.