मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. मोबाईल
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 एप्रिल 2020 (11:20 IST)

Jio POS Lite अॅप लाँच, जिओ पार्टनर बनून मिळवा फायदा

रिलायन्स जिओने युझर्संसाठी Jio POS Lite खास अॅप लाँच केला आहे. या अॅपच्या माध्यमातून जिओ लोकांना पार्टनर बनवू शकते. तसेच जिओ युझर्संच्या नंबरवर रिचार्ज कमिशन देत आहे. 
 
हे अॅप डाऊनलोड करुन पैसा कमवता येऊ शकतो. या अॅपच्या माध्यमातून जिओ पार्टनर बनवून दुसऱ्या जिओ नंबरवर रिचार्ज करता येवू शकते. त्यासाठी निश्चित कमिशन मिळणार आहे. 
 
कंपनीसोबत जोडलेल्या पार्टनरला एका रिचार्जवर 4.16 टक्के कमिशन मिळणार आहे. या कमिशनची रक्कम लोकांना बँक किंवा ई-वॉलेट वर जमा करता येऊ शकते.