शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: बुधवार, 18 ऑक्टोबर 2017 (13:27 IST)

13 नोव्हेंबर रोजी लाँच होणार आहे डुअल कॅमेराचा Moto X4

लेनेवोचे स्वामित्व असणारी कंपनी मोटोरोला आपल्या एक्स सिरींजचे नवीन   Moto X4 स्मार्टफोन 13 नोव्हेंबर रोजी लाँच करणार आहे. या नवीन हँडसेटला आधी 3 ऑक्टोबर रोजी लाँच करण्यात येणार होते, पण कंपनीने आपल्या ट्विटर हँडलच्या माध्यमाने याला नंतर लाँच करण्याचा सल्ला दिला होता.  
 
स्पेसिफिकेशन
मोटो एक्स4 मध्ये 5.2 इंच आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रेजोल्यूशन 1080x1920पिक्सल्स आहे. या फोनमध्ये 2.2 गीगाहर्ट्ज स्नॅपड्रॅगन 630 चिपसेट देण्यात आले आहे. फोनमध्ये 3 जीबी आणि 32 जीबी स्टोरेज देण्यात आले आहे, ज्याला मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमाने 2टीबी पर्यंत वाढवण्यात येण्याची शक्यता आहे.  
 
लाजवाब कॅमेरा आणि बॅटरी     
केमॅर्‍याची गोष्ट केली तर या स्मार्टफोनच्या रियरमध्ये डुअल कॅमेरा सेटअप होऊ शकतो. यात एक 12 मेगापिक्सलचा सेंसर आहे आणि दुसरा  दुसरा 8 मेगापिक्सलचे सेंसर असेल. तसेच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात येणार आहे. एंड्रॉयड 7.1 नॉगटवर काम करणारे या स्मार्टफोनमध्ये 3000 एमएएचची नॉन-रिमूवेबेल बॅटरी मिळेल.