मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: गुरूवार, 21 सप्टेंबर 2017 (09:44 IST)

घ्या, जिओ डोंगल फक्त रु.999 मध्ये

'जिओ'ने फक्त रु.999 मध्ये जिओफाय डोंगल देण्याची घोषणा केली आहे. याआधी डोंगल घेण्यासाठी ग्राहकांना रु.1999 खर्च करावे लागत होते. ग्राहकांना जिओफाय डोंगलवर तब्बल 1 हजार रूपयांची सवलत देऊ केली आहे. ग्राहकांना 20 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान जिओफाय डोंगल खरेदी करून ऑफरचा फायदा घेता येणार आहे. याआधी देखील जिओफाय डोंगलसाठी ऑफर देण्यात आली होती. त्यामध्ये एकदा रु.1999 डोंगल खरेदी केल्यास त्यावर तेवढ्याच किंमतीचा मोफत डेटा देण्यात आला होता. आता जिओच्या नव्या रु.999 च्या ऑफरनुसार जिओफाय खरेदी करणा-यांना चार रिचार्ज सायकलपर्यंत 28 दिवसांसाठी अमर्यादित कॉल्स, 2जीबीपर्यंत 4जी डेटा प्रति दिवस मिळणार असून, दररोज 100 एमएमएस मोफत किंवा 6 रिचार्ज सायकलपर्यंत 28 दिवसांसाठी अमर्यादित कॉल्स, 1 जीबीपर्यंत 4जी डेटा देण्यात येणार आहे.