शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: गुरूवार, 14 सप्टेंबर 2017 (17:29 IST)

व्हॉट्सअॅपवर 'डिलीट फॉर एव्हरीवन' चा ऑप्शन

व्हॉट्सअॅपवर अनेकदा एखादा मेसेज, फोटो, व्हिडीओ चुकून पाठवला जातो. मात्र तो डिलीट किंवा मागे घेण्याची कोणतीच सुविधा उपलब्ध नव्हती. त्यामुळे समोरच्या व्यक्तीची माफी मागणे एवढा एकच काय तो पर्याय बाकी राहायचा. पण आता व्हॉट्सअॅपने नवं फिचर आणलं असून यामुळे एखादा मेसेज चुकून फॉरवर्ड केल्यास तो पुन्हा मागे घेण्याची म्हणजेच रिकॉल करण्याची सुविधा मिळणार आहे. व्हॉट्सअॅप लवकरच अँड्रॉइड आणि आयओएसवर रिकॉलचा पर्याय देणार आहे. 'डिलीट फॉर एव्हरीवन' असं या ऑप्शनचं नाव असेल. 

हे फिचर आल्यानंतर तुम्ही एखादा मेसेज, फोटो, ऑडिओ फाईल किंवा डॉक्यूमेंट फाईल रिसीव्हरकडे पोहोचण्याआधीच डिलीट करु शकणार आहात. मात्र यासाठी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवण्याची गरज आहे. एखादा मेसेज पाठवल्यानंतर तो रिकॉल करण्यासाठी म्हणजे पुन्हा मागे घेण्यासाठी तुमच्याकडे फक्त पाच मिनिटांचा वेळ असणार आहे. पाच मिनिटांनंतर तो मेसेज तुम्ही डिलीट करु शकत नाही. हे फिचर अँड्रॉइड आणि आयओएस युजर्ससाठी उपलब्ध असणार आहे.