शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Updated : गुरूवार, 5 ऑक्टोबर 2017 (17:36 IST)

गुगलची आय फोनला टक्कर पिक्सेल 2 आणि पिक्सेल 2 XL बाजारात

गुगलने पुन्हा आय फोनला जोरदार टक्कर दिली असून. यावेळी पिक्सेल 2 आणि पिक्सेल 2 XL बाजारात दाखल  केले आहेत. यामध्ये  गुगलने एचटीसीसोबत दोन्ही स्मार्टफोन तयार केला असून जर आपण  फीचर्स पाहिले तर  फोन अॅपलच्या आयफोन 8 आणि आयफोन 8 प्लसला टक्कर  देणार आहेत. यामध्ये आपल्या देशात पिक्सेल 2 ची किंमत 61 हजार रुपयांपासून तर  फोनच्या 128GB व्हेरिएंटची किमत 70 हजार रुपये असणार आहे. तर  पिक्सेल 2 XL ची किंमत 73 हजार असून  128GB व्हेरिएंटची किंमत 83 हजार रुपये असणार आहे. 

या मोबाईलची काही फीचर्स 

  •  5 इंच आकाराची स्क्रीन
  • पिक्सेल 2 XL मध्ये 6 इंच आकाराची स्क्रीन
  •  64GB आणि 128GB व्हेरिएंटमध्ये हे फोन
  • स्नॅपड्रॅगन 835 प्रोसेसर आणि 4GB रॅम 
  • वॉटरप्रूफ डिझाईनसह IP 67 सर्टिफाईड
  • ड्युअल सेन्सर टेक्निक
  •  12.2 मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा 
  • सेल्फीसाठी 8 मेगापिक्सेल कॅमेरा
  •  ई-सिम सपोर्ट 
  •  अँड्रॉईडची लेटेस्ट ओरियो 8.0 
  • स्टेरियो स्पीकर