Dharma Sangrah
✕

मोटोरोलाचा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन भारतात लाँच होणार

Updated: बुधवार, 25 डिसेंबर 2019 (15:43 IST)
 
मोटोरोला इंडियाने ट्विटवरवर एक पोस्ट शेअर करून ही घोषणा केली आहे. Motorola Razr (2019) ला लवकरच भारतात लाँच करणत येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. परंतु, कंपनीने लाँच करण्याची  तारीख अद्याप जाहीर केली नाही. कंपनीने नोव्हेंबरमध्ये याच्या लाँचिंगनंतर भारतीय वेबसाइटवर एक रजिस्ट्रेशन पेज तयार केले होते. या ठिकाणी ग्राहकांना अपडेटेड माहिती मिळू शकत आहे. कंपनी लवकरच हा फोन लाँच करणार असली तरी या फोनच्या किमतीची घोषणा अद्याप करण्यात आली नाही. गेल्या महिन्यात अमेरिकेत करण्यात आलेल्या घोषणेच्या जवळपास या फोनची किंमत असू शकते. अमेरिकेत या फोनची किंमत 1,499 डॉलर म्हणजेच भारतात या फोनची किंमत 1 लाख 6 हजार रुपये असू शकते. तर सॅमसंगच गॅलेक्सी फोल्डची किंमत 1 लाख 64 हजार 999 रुपये इतकी आहे.
 
Motorola Razr (2019) चे खास वैशिष्ट्य म्हणजे यात अनफोल्डेड स्टेट 6.2 इंचाचा फ्लेक्सिबल ओएलईडी एचडी (876x2142 पिक्सल) डिस्प्ले आहे. फोल्डेड स्टेटमध्ये 2.7 इंचाचा (600x800 पिक्सल) क्विक व्ह्यू डिस्प्ले आहे. फोल्डेड स्टेटचा हा क्विक डिस्प्ले सेल्फी कॅप्चर करण्यासाठी़, नोटीफिकेशन पाहाण्यासाठी आणि म्युझिक नियंत्रण करण्यासाठी उपयोगी पडणार आहे. ह्या फोनमध्ये 6 जीबी रॅम सह ऑक्टा-कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसर देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोल्डेड असताना सेल्फी काढता येऊ शकणार आहे. तर 5 मेगापिक्सलचा सेकंडरीकॅमेरा डिस्प्ले नॉच देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट देण्यात आला आहे. या फोनची बॅटरी क्षमता 2,510 एमएएच दिली आहे. फास्ट चार्जिंग करण्यासाठी 15 W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे.

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागातील तिकीट तपासणी कर्मचारी आता एका नव्या रूपात दिसणार; विशेष जॅकेट घालणार

नागपूरमध्ये नऊ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, संतप्त जमावाने आरोपीला मारहाण करून ठार केले

सततच्या लैंगिक छळाला कंटाळून अल्पवयीन मुलीने क्रिकेट बॅटने वडिलांची हत्या केली; नागपूरमधील घटना

दिल्लीतील आंदोलनादरम्यान संजय राऊत यांची प्रकृती खालावली, बेशुद्ध होऊन कोसळले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सार्वजनिक जीवनातील २५ वर्षे पूर्ण; गृहमंत्री अमित शाह यांनी सेवा आणि समर्पणबद्दल शुभेच्छा दिल्या

पुढील लेख
Show comments