शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: गुरूवार, 28 फेब्रुवारी 2019 (12:38 IST)

मीडियाटेक हीलियो पी70 प्रोसेसरसह लवकरच लॉचं होईल रियलमी 3

रियलमीने बजेट स्मार्टफोन सेगमेंटमध्ये फारच कमी वेळेत आपले नाव उभे केले आहे. ते लवकरच आपल्या लोकप्रिय स्मार्टफोन रियलमी 1 चा अपग्रेड (Realme 2) लॉन्च करणार आहे. कंपनीने सांगितले आहे की रियलमी 3 हेडसेट 4 मार्च रोजी लॉन्च केला जाईल. या संदर्भात अनेक टीझर देखील जारी केले गेले आहेत. दुसरीकडे, रियलमीच्या आणखी एक डिव्हाईस रियलमी ए1 बद्दल माहिती मिळाली आहे, जे Realme 3 सह लॉन्च केले जाऊ शकते.
 
या डिव्हाईसमध्ये वॉटरड्रॉप नॉच आहे आणि वाइड बेझल येऊ शकतात. या व्यतिरिक्त फोनचा AnTuTu बेंचमार्क स्कोर देखील दिसत आहे. फोनला 137,976 अंक मिळाले आहे. रियलमीचा हा नवीन फोन मीडियाटेक हीलियो पी70 प्रोसेसरसह येईल आणि ते Android 9 पाई वर आधारीत कलरओएस 6 वर चालेल. एका जुन्या अहवालानुसार, रियलमी 3 चे दोन प्रोसेसर व्हेरिएंट असतील. फोनमध्ये विविध मीडियाटेक चिपसेट्स वापरल्या गेल्या आहे. ग्लोबल व्हेरिएंट मीडियाटेक हीलियो पी60 प्रोसेसरसह येईल. एक मॉडेल हीलियो पी70 प्रोसेसरसह येईल, जे फक्त भारतात लॉन्च होणार आहे. लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे यापैकी एक सेन्सर 48 मेगापिक्सेल असू शकतो. या स्मार्टफोनमध्ये अँड्रॉइड पाई ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित कोलोर OS 6.0 असू शकते. तसेच, या फोनमध्ये स्क्रीनवरच्या बाजूला ड्यूड्रॉप नॉच असू शकतो.