शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: बुधवार, 15 मे 2019 (10:13 IST)

Realme 3 या स्मार्टफोनची मार्च 2019 मध्ये सर्वाधिक विक्री

Redmi Note 7 Pro आणि Redmi Note 7 या MI कंपनीच्या स्मार्टफोनला मागे टाकत Realme 3 हा स्मार्टफोन ऑनलाईन मार्केटमध्ये सर्वाधिक विक्री होणारा स्मार्टफोन ठरला आहे. काऊंटर पॉईंट (Counterpoint) या रिसर्च बेस्ड कंपनीने मार्च 2019 मधील ऑनलाईन मार्केटद्वारे विकणाऱ्या स्मार्टफोनची आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार Realme 3 या स्मार्टफोनची मार्च 2019 मध्ये सर्वाधिक विक्री झाली आहे.
 
Realme 3 हा स्मार्टफोन गेल्यावर्षी 1 मे रोजी भारतात लाँच करण्यात आला. त्यानंतर Realme कंपनीद्वारे Realme 1, Realme 2, Realme 3, Realme 2 Pro, Realme 3 Pro, Realme U1, Realme C1, आणि Realme C2, हे स्मार्टफोन भारतात लाँच केले आहेत.
 
काऊंटर पॉईंट या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, Realme ही स्मार्टफोन कंपनी बदलत्या ट्रेंडनुसार विविध स्पेसिफिकेशन, नवनवीन फीचरचा स्मार्टफोनमध्ये नेहमीच समावेश करत असते. त्यामुळे Realme या स्मार्टफोनला भारतातील तरुणांची सर्वाधिक पसंती मिळत आहे. नुकतंच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, भारतात रेडमी नोट 7 आणि रेडमी नोट 7 प्रो या दोन्ही फोनची 10.2 टक्के विक्री झाली आहे. तर Realme या स्मार्टफोनची 10.4 टक्के विक्री झाली आहे.