बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By

OnePlus 7 स्मार्टफोनबद्दल अजून कोणालाही माहीत नसलेले खास फीचर जाणून घ्या

चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी वनप्लस आपल्या नवीन फ्लॅगशिप OnePlus 7 बाजारात लाँच करण्याच्या तयारीत आहे. वनप्लस 7 बद्दल खूप चर्चा सुरू आहे पण नक्की काय हे अजून कोणालाही माहीत नाही तर जाणून घ्या याबद्दल काही माहिती... 
 
सूत्रांप्रमाणे वनप्लस दो नवीन फोन लॉन्च करणार ज्यात वनप्लस 7 आणि वनप्लस 7 प्रो सामील आहेत. दोन्ही फोन 14 मे रोजी लाँच होणार आहेत.
 
फोनचे स्पेसिफिकेशन या प्रकारे असू शकतं: OnePlus 7 ला क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 855 प्रोसेसर आणि किमान 6 जीबी रॅमसह लॉन्च केलं जाईल. यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर असेल. ट्रिपल रियर कॅमेरा आणि 3X झूम असेल. यात वायरलेस चार्जिंग बहुतेकच असणार. सूत्रांप्रमाणे वनप्लसमध्ये 3.5 एमएमचे हेडफोन जॅक मिळणार नाही. वनप्लस 7 प्रो मध्ये 5जी ची सुविधा मिळेल. फोनमध्ये क्वॉड एचडी प्लस डिस्प्ले मिळेल. फोनमध्ये 4000mAh ची बॅटरीसह 30 वॉटचे चार्जर मिळेल.
 
कंपनीने सांगितले की वनप्लस 7 मध्ये पॉप अप सेल्फी कॅमेरा असेल. अशात फोन पूर्णपणे बेजललेस असेल तसेच वनप्लस 7 ला वाटरड्रॉप नॉच डिस्प्लेसह लॉन्च केले जाईल. फोनच्या बॅक पॅनलवर ग्लास बॉडी मिळेल तसेच कोपर्‍यांवर अॅल्यूमिनियम वापरण्यात आले आहे.
 
वनप्लस 7 ची किंमत $569 अर्थात सुमारे 39,690 रुपये असेल आणि वनप्लस 7 प्रो ची 6GB+128GB ची किंमत 699 यूरो अर्थात 54,670 रुपये असू शकते.