मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

नवीन वैशिष्ट्यांसह Honda Amaze लॉन्च, किंमत 8.56 लाख रुपये

Honda Amaze VX CVT feature
होंडाने आपल्या लहान सेडान कार अमेझचे बाजारात नवीन आणि सर्वात लेटेस्ट ऍडिशन आणले आहे. यात रीअर कॅमेरा आणि चांगली स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी सारख्या विविध वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे. 
 
होंडा कार्स इंडिया लिमिटेड (एचसीआयएल) ने अमेझचा नवीन ग्रेड वीएक्स सीव्हीटी ऍडिशन मार्केटमध्ये लॉन्च केले आहे. हे मॉडेल डिझेल आणि पेट्रोल दोन्ही प्रकारात उपलब्ध आहे. पेट्रोल वेरिएंटची शोरूम किंमत 8.56
लाख रुपये जेव्हा की डिझेल वेरिएंटची किंमत 9.56 लाख रुपये ठेवली गेली आहे.
 
एचसीआयएलचे विपणन व विक्री विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि संचालक राजेश गोयल यांनी सांगितले की दुसरी पिढी होंडा अमेझने सेडान श्रेणीत नवीन रेकॉर्ड स्थापित केले आहे. आमचे 20 टक्क्यांपेक्षा अधिक ग्राहक
पेट्रोल आणि डिझेल दोन्हीमध्ये प्रगत सीव्हीटी वेरिएंटची निवड करतात.